। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यातील नडोदे ग्रामपंचायत पोटनिवडणूकिचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुषमा संतोष पालकर यांचा विजय झाला. खालापूर तालुक्यातील नडोदे ग्रामपंचायतमध्ये ओबीसीसाठी राखीव असलेली जागा शासनाने रद्द केल्याने तिथे सर्वसामान्य प्रवर्गातील उमेदवाराने निवडणूक लढविली.
वार्ड क्रमांक 1 मध्ये सर्वसामान्य महिला राखीव जागा असल्याने तिथे शिवसेनेच्या लता विनोद फराट व राष्ट्रवादीकडून सुषमा संतोष पालकर या उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. एकूण 372 मतदारांपैकी 327 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सेनेच्या लता फराट यांना 157 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या सुषमा पालकर यांना 164 मते मिळाली.
तसेच नोटाला 6 मते पडली. यामध्ये पालकर यांचा 7 मतांनी विजय झाला. गेली दहा ते बारा वर्ष रिक्त असलेल्या दोन ओबीसी जागेवर कोणत्याच ओबीसी समाजातील व्यक्तीने उमेदवारी न भरल्याने ही जागा रिक्तच होती. तर वार्ड क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पेश कमलाकर सुर्वे यांची बिनविरोध निवड झाली.