| सुतारवाडी | वार्ताहर |
सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या द.ग. तटकरे माध्यमिक विद्यालय कोलाडच्या शिक्षिका सायरा शेख पठाण या दि.29 रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यांची एकूण 39 वर्षे सेवा होऊन त्या सेवानिवृत्त झाल्या. हिंदी भाषेवर विशेष प्रभुत्व असलेल्या शेख यांनी गेल्या 39 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक विद्यार्थी घडविले. त्यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमास राजेंद्र पालवे, सुखदेव तिरमले, शिरीष येरुणकर, वसंत थोरात, उदय घोसाळकर तसेच माजी शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी तसेच द.ग. तटकरे माध्यमिक विद्यालय कोलाड व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षिका सुचेता तटकरे यांनी केले.