साईराज वरसोलीने जिंकला जय मल्हार चषक


| रेवदंंडा | वार्ताहर |

इंडिया आघाडी पुरस्कृत टेनिस बॉल मर्यादित षटकांचे क्रिकेटच्या सामन्यांत जय मल्हार चषक 2024चे विजेतेपद साईराज वरसोली संघाने पटकाविले. तर व्दितीय क्रमांक नाखवा स्पोर्टस् हाशिवरे, तृतीय क्रमांक श्रावणी स्पोर्टस् चौल या संघाने मिळविले. स्पर्धेत मालिकावीर सायकलचा विजेता साईराज वरसोली संघाचा परशुराम पाटील तसेच, उत्कृष्ट फलदांज हाशिवरे संघाचा प्रसाद पाटील, उत्कृष्ट गोलदांज साईराज संघाचा रूपेश डवले यांची निवड करण्यात आली.

शेकापक्ष महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील व रायगड जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाउ ठाकूर पुरस्कृत इंडिया आघाडी जय मल्हार चषक 2024 चे आयोजन थेरोंडा जय मल्हार क्रिकेट क्लब व ग्रामस्थ थेरोंडा यांनी रेवदंडा हरेश्‍वर मैदानात दि. 10,11,12 फेब्रुवारी 2024 रोजी केले होते. या स्पर्धेचा शुभारंभ काँग्रेस अलिबाग तालुका अध्यक्ष भास्कर चव्हाण, सुरेश घरत-कोटकर, अशोक अंबुकर, अमोल पाटील, थेरोंडा ग्रामस्थ गाव पाटील तसेच, थेरोंडा ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकास 30 हजार रूपये व भव्य चषक, व्दितीय क्रमांकास 20 हजार रूपये व भव्य चषक, तृतीय क्रमांकास 10 हजार रूपये व भव्य चषक तसेच, मालिकावीर-सायकल, उत्कृष्ट फलदांज-चषक, उत्कृष्ट गोलदांज-चषक, आदी बक्षिसे ठेवण्यात आली होती.

स्पर्धेचा बक्षिस समारंभास रायगड जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाउ ठाकूर, अँड उमेश ठाकूर, संदिप खोत, निलेश नाईक, अशोक अंबुकर, आशिष गोंधळी आदी मान्यवराची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे समालोचन व सुत्रसंचलन प्रदिप भोईर न्हावे, गुणलेखन धरणे गुरूजी, आदीने विशेष परिश्रम घेतले. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी थेरोंडा जय मल्हार क्रिकेट संघ व थेरोंडा ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version