आई वरदानी सुडकोली संघ विजेता
। रेवदंडा । प्रतिनिधी ।
शेकापक्ष पुरस्कृत रामराज ग्रा.प. माजी सरपंच मोहन धुमाळ आयोजित नीर इलेव्हन ताजपुर संघाचे सहकार्याने मर्यादित षटकाच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ताजपुर येथील मैदानात करण्यात आले होते. स्पर्धेच्या दरम्यान शेकापक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी भेट दिली. त्यांचेसमवेत शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, विक्रांत वार्डे आणी रामराज विभागातील शेकापक्ष कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत आई वरदानी सुडकोली संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक भिंगारी पनवेल, तृतीय क्रमांक श्री गणेश कुदे संघाने पटकाविला.
या स्पर्धेत मालिकावरी भिंगारी पनवेल संघाचा कुणाल नाईक, उत्कृष्ट फलदांज आई वरदानी सुडकोळी संघाचा रोशन तांबडकर, उत्कृष्ट गोलदांज श्री गणेश कुदे संघाचा मयुर पाटील यांची निवड करण्यात आली. स्पर्धेत राम हाले, संतोष सुडकू यांनी पंचाचे तर आनंद झावरे यांनी स्कोअरचे काम पाहिले. संपूर्ण स्पर्धेचे समालोचन व सूत्रसंचलन इम्रान बुखारी यांनी केले. स्पर्धेत एकूण 24 संघानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांकास रोख 33 हजार 333 रूपये व भव्य चषक, द्वितीय क्रमांकास रोख 22 हजार 222 रूपये व भव्य चषक, तृतीय क्रमांकास रोख 11 हजार 111 रूपये व भव्य चषक तसेच मालिकावीर चांदीचे ब्रेसलेट, उत्कृष्ट गोलदांज व फलदांज कुलर तसेच प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचसाठी चषक आदी बक्षिसे ठेवण्यात आली होती.