| अलिबाग | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यात 15 तालुक्यांतील 810 ग्रामपंचायतींसाठी 22 आणि 23 एप्रिलला तहसील कार्यालयात सरपंचपदासाठी आरक्षण सोडत होणार आहे. त्यामुळे या आरक्षण सोडतीकडे गावातील कारभाऱ्यांचे लक्ष लागले आहे. रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी 2025 ते 2030 या कालावधीसाठी आरक्षण निश्चित करून आरक्षण अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 810 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला 16, महिला 17, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 62, महिला 62, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 109, महिला 110, सर्वसाधारण जागा खुला 217, महिला 217 अशी आहे.
अलिबाग तालुक्यात 62 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी अनुसूचित जाती आरक्षित खुला जागा शून्य, महिला 1, अनुसूचित जमाती खुला 5, महिला 6, नागरिकांचा मागासप्रवर्ग खुला 9, महिला 8, सर्वसाधारण जागा खुला 17, महिला 16 अशी आहे. मुरुड तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी अनुसूचित जाती खुला शून्य, महिला 1, अनुसूचित जमाती खुला 3, महिला 2, नागरिकांचा मागासप्रवर्ग खुला 3, महिला 4, सर्वसाधारण जागा खुला 6, महिला 5 अशी आहे. पेण तालुक्यात 64 ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती खुला 1, महिला शून्य, अनुसूचित जमाती खुला 7, महिला 7, नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला 8, महिला 9, सर्वसाधारण जागा खुला 16, महिला 16 जागा आहेत. पनवेल 71 ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती खुला 2, महिला 1, अनुसूचित जमाती खुला 5, महिला 6, नागरिकांचा मागासप्रवर्ग खुला 9, महिला 10, सर्वसाधारण जागा खुला 20, महिला 18 जागा आहेत. उरण 35 ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती खुला 1, महिला शुन्य, अनुसूचित जमाती खुला 2, महिला 1, नागरीकांचा मागासप्रवर्ग खुला 4, महिला 5, सर्वसाधारण जागा खुला 11, महिला 11 जागा आहेत.
कर्जत तालुक्यातील 55 ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती खुला 1, महिला 1, अनुसूचित जमाती खुला 8, महिला 8, नागरिकांचा मागासप्रवर्ग खुला 8, महिला 7, सर्वसाधारण जागा खुला 10, महिला 12 जागा आहेत. खालापूर 45 ग्रा.पं. अनुसूचित जाती खुला 1, महिला 1, अनुसूचित जमाती खुला 5, महिला 5, नागरिकांचा मागासप्रवर्ग खुला 6, महिला 6, सर्वसाधारण जागा खुला 11, महिला 10 जागा आहेत. रोहा तालुक्यात 64 ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती खुला 1, महिला 2, अनुसूचित जमाती खुला 5, महिला 5, नागरिकांचा मागासप्रवर्ग खुला 9, महिला 8, सर्वसाधारण खुला 17, महिला 17 जागा आहेत. सुधागड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती खुला शून्य, महिला 1, अनुसूचित जमाती खुला 5, महिला 6, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 4, महिला 5, सर्वसाधारण खुला 7, महिला 5 जागा आहेत.
माणगाव तालुक्यात 74 ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती खुला 2, महिला 2, अनुसूचित जमाती खुला 3, महिला 4, नागरिकांचा मागासप्रवर्ग खुला 10, महिला 10, सर्वसाधारण जागा खुला 22, महिला 21 जागा आहेत. तळा 25 ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती खुला 1, महिला 1, अनुसूचित जमाती खुला 2, महिला 2, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 4, महिला 3, सर्वसाधारण जागा खुला 5, महिला 7 जागा आहेत. महाड तालुक्यात 134 ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती खुला 3, महिला 3, अनुसूचित जमाती खुला 5, महिला 4, नागरिकांचा मागासप्रवर्ग खुला 18, महिला 18, सर्वसाधारण जागा-खुला 41, महिला 42. पोलादपूर 42 ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती खुला 1, महिला 2, अनुसूचित जमाती खुला 2, महिला 1, नागरिकांचा मागासप्रवर्ग खुला 5, महिला 6, सर्वसाधारण जागा खुला 13, महिला 12 जागा आहेत.
श्रीवर्धन तालुक्यात 43 ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती खुला 1, महिला 0, अनुसूचित जमाती खुला 3, महिला 3, नागरिकांचा मागासप्रवर्ग खुला 6, महिला 6, सर्वसाधारण जागा खुला 11, महिला 13 तर म्हसळा तालुक्यात 31 ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती खुला 1, महिला 1, अनुसूचित जमाती खुला 2, महिला 2, नागरिकांचा मागासप्रवर्ग खुला 6, महिला 5, सर्वसाधारण जागा खुला 10, महिला 12 जागा आहेत.
आरक्षण निश्चितीसाठी सभा तालुकानिहाय सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी प्राधिकृत व नियुक्ती करुन आणि सरपंच आरक्षणाची तालुक्यात सभा घेण्यासाठी तारीख निश्चितीची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. अलिबाग, पनवेल, कर्जत, रोहा, माणगाव, श्रीवर्धन व पेणमध्ये 22 एप्रिल व उरण, खालापूर, सुधागड, तळा, महाड, म्हसळा व मुरूडमध्ये 23 एप्रिल सभा घेतली जाणार आहे. तसेच माणगाव तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षण निश्चितीसाठी पोलादपूरमध्ये 24 एप्रिल रोजी सभा घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीची लोकसंख्या, मागील आरक्षणाचा सखोल अभ्यास करून अचूक आरक्षण निश्चित केले जाणार आहे.