। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
टोक्यो ऑलिम्पिकसाठीचा ‘अ’ पात्रता निकष पार केल्याच्या पुढच्याच दिवशी जलतरणपटू साजन प्रकाश याने रोममधील सेटे कॉली करंडक जलतरण स्पर्धेत दमदार कामगिरी कायम ठेवली. त्याने 200 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. प्रकाशने 1.49.73 सेकंद अशी कामगिरी करत 2010मध्ये वीरधवल खाडेने (1.49.86 सेकंद) रचलेला विक्रम मोडीत काढला. प्रकाशने या महिन्यात तिसर्यांदा राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. प्रकाशने शनिवारी पुरुषांच्या 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात 1.56.38 सेकंद अशी वेळ नोंदवत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा भारताचा पहिला जलतरणपटू होण्याचा मान पटकावला होता.