वेश्‍वीतील सकल मराठा समाज शेकापसोबत

प्रफुल्ल पाटील यांना बहुमताने निवडून आणणार

वेश्‍वी येथील सकल मराठा समाजाच्या गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत शेतकरी कामगार पक्षाच्या तसेच थेट सरपंच पदाचे उमेदवार प्रफुल्ल पाटील यांच्या सोबत समाजाने उभे राहण्याचा एकमताने ठराव घेतला.

वेश्‍वी येथे मराठा समाज भवन उभारण्याबाबत आ. जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला असून त्यासंदर्भात समाधान व्यक्त देखील करण्यात आले. किशोर कदम, सुरेंद्र शेळके महादेव जाधव आदींसह मोठया प्रमाणावर मराठा समाजाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

वेश्‍वी परिसरात मराठा समाजाचे भवन व्हावे यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील हे सुरवातीपासून आग्रही आहेत. जुलैमध्ये झालेल्या बैठकीतच जयंत पाटील यांनी सकल मराठा समाजाला ग्वाही देत वेश्‍वी परिसरात मराठा भवन उभारण्यात येणार असल्याचा शब्द दिला होता. त्यानुसार होणारे मराठा भवन हे वेश्‍वी किंवा अलिबाग तालुक्याचे नाही तर ते जिल्हयाचे आहे. त्यामुळे ते उभारण्याचे काम करणारच. ते होऊ नये म्हणून काहीजण प्रयत्न करीत आहेत. पण त्यांच्या प्रयत्नाना भिक न घालता मराठा भवन उभारणारच. मग त्यासाठी स्वतः जमीन देण्याची वेळ आली तर त्यासाठी ती पण देण्याची आपली तयारी देखील जयंत पाटील यांनी दाखवली आहे. त्यांच्या या भुमिकेचे मराठा समाजाकडून जोरदार स्वागत केले जात आहे.

त्यामुळे मराठा समाजाने शेतकरी कामगार पक्ष आणि थेट सरपंच पदाचे उमेदवार प्रफुल्ल पाटील यांच्या सोबत ठाम राहण्याची भुमिका घेतली आहे.

Exit mobile version