खेड येथे साकारतोय ऑक्सिजन प्लांट

। खेड। अजित जाधव ।
खेड येथील नगर परिषदेच्या दवाखान्याच्या परिसरात अत्याधुनिक प्रकल्प उभारण्यात येत आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. खेड शहरात दुसर्‍या लाटेत कोरोनाचा फैलाव वाढण्यापूर्वीच नगरपालिकेने तातडीने निर्णय घेऊन आर्थिक तरतूद करून पालिकेच्या दवाखान्यात कोव्हीफ केअर सेंटर सुरू केले. त्यासाठी उद्योजक कौस्तुभ बुटाला यांच्या माध्यमातून भरीव मदत व वस्तू रूपाने या कोव्हिडं केअर सेंटरला सतत मिळत आहे. या सेंटरचे नाव श्रीमती उषा हिराचंद बुटाला यांच्या नावाने ठेवण्यात आले. या सेंटरमध्ये अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने कोरना बाधित रुग्णांसाठी हे सेंटर वरदान ठरले. या सेंटरमध्ये पूरक प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने. बरे होणार्‍या रुग्णांची संख्या देखील अधिक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यामुळे नगरपरिषद दवाखान्याच्या ऑक्सिजनची गरज पूर्ण व्हावी यासाठी येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला. या निर्णयाला उद्योजक कौस्तुभ बुटाला यांचे सहकार्य लाभले असून, त्यांच्या योगदानातून ऑक्सिजन प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पाची पाहणी उद्योजक कौस्तुभ बुटाला यांच्यासोबत नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी नुकतीच केली.

Exit mobile version