। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतींचे विसर्जन होत असल्याने यशवंतनगर पंचक्रोशीतील भाविकांना आता साखर चौथीच्या गणपतींचे वेध लागले आहेत. मजगाव येथील सप्तरंगी मित्र मंडळ आगर आळी तर्फे साखर चौथ गणपतीचा उत्सव सोमवारी (दि.12) आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे सुरेश भोईर, दीपक घाग, अतिश आयरकर कल्पेश पाटील अरुण पाटील यांनी दिली आहे.