कंत्राटी सफाई कामगारांची पगारवाढ

। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातील कंत्राटी सफाई कामगार यांना 15 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पगारवाढ झाली आहे. त्यामुळे या सर्व सफाई कामगारांनी पेढे वाटप करून आपला आनंदोत्सव साजरा केला.


मागील 15 वर्षा पासून या कामगारांची पगारवाढ केली नव्हती, मात्र यावेळी ठेकेदाराला पालिकेकडून स्वच्छतेचा ठेका देते वेळी पालिकेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि कोकण श्रमिक संघाच्या माथेरान युनिट अध्यक्षा प्रिया वहालकर व सल्लागार दिनेश सुतार यांच्या आग्रही भूमिकेमुळे कामगारांची पगारवाढ करण्यात आली आहे. यामुळे यासर्व सफाई कामगारांनी आपला आनंद साजरा करत या नवीन कामाचा शुभारंभ नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केला. तसेच या पगारवाढीबद्दल सफाई कामगारांनी मुख्याधिकारी व सल्लागार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून त्यांचे आभार मानले.
या प्रसंगी नवीन ठेकेदार ग्रुपचे अभय नरवडेकर, प्रदीप माने, पालिका आरोग्य विभागाचे अभिमन्यू यळवंडे, अन्सार महापुळे, नरेंद्र सावंत, कैलास सोनावळे, बाळू सांभरी, दिनेश पवार, संजय गोळे, विश्‍वास सातपुते, चंद्रकांत सांबरी, विष्णू पारधी आणि मोठ्या प्रमाणात सफाई कामगार पुरुष, महिला वर्ग उपस्थित होता.

Exit mobile version