दोन कंपन्यात पगारवाढीचे करार

। उरण । वार्ताहर ।
मे. लॅबगार्ड इंडस्ट्रिज पेण मधील कामगारांना तीन वर्षासाठी 9 हजार रुपये व मे. अष्टे लॉजिस्टिक पळस्पे पनवेलमधील कामगारांसाठी तीन वर्षासाठी 8 हजार रुपयांची पगारवाढ करण्यात आली. त्याच बरोबर बोनस, कामगारांच्या परिवारासाठी मेडिक्लेम पॉलिसी व इतर सोई सुविधा देण्याचे मान्य करण्यात आले.

या करारनाम्या प्रसंगी कामगार नेते महेंद्र घरत, कार्याध्यक्ष पी.के.रमण, सरचिटणीस वैभव पाटील तसेच लॅबगार्ड कंपनीचे ऑपरेशन डायरेक्टर अजय कणेकर, कामगार प्रतिनिधी सुभाष पाटील, प्रमोद पाटील, निलेश पाटील, दत्ता पाटील, निलेश टेमघरे, प्रदीप पाटील तर अष्टे लॉजिस्टिक कंपनीचे अ‍ॅडमिन मॅॅॅनेजर कांतीलाल पाटील, कामगार सुभाष पाटील, हेमंत पाटील, सुरेंद्र पाटील, विलास लबडे, रेवनाथ नाईक, गणेश घरत, गुरुनाथ मते, राम मते, पाडुरंग पैर, अरुण म्हसकर उपस्थित होते. दोन्ही कंपन्यांनातील कामगारांनी पगारवाढीबद्दल संघटनेचे आभार मानले.

Exit mobile version