। उलवे । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा कार्यकारणी सदस्य व ज्येष्ठ पत्रकार माधव बाबु पाटील यांच्या मातोश्री तुळसाबाई बाबु पाटील यांचे वयाच्या 93 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. बामणडोंगरी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी आ.बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, नारायण घरत, महादेव पाटील, सुरेश पाटील, आर. सी. घरत, रविशेठ पाटील, सी. बी. वाडकर, अजित येरुणकर, शैलेश ओसवाल, डॉ. सुभाष सिंग, रामदास नाईक संजय नाईक, रत्नाकर पाटील आदींसह सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली.