फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसरी व्यक्ती उभी करून खरेदीखत केले आणि जमीन स्वतःच्या नावे करून तिची विक्री करणाऱ्या दोघांना पनवेल तालुका पोलिसांनी 12 सप्टेंबर रोजी अटक केली. प्रभाकर बंडू नाईक (डेरवली) आणि अंबावी रणछोड पटेल अशी दोघांची नावे आहेत.
संजय महागावकर ( गुजरात) व त्यांच्या आईच्या नावे वाघाची वाडी आणि धोदाणी येथे जमीन आहे. ते घरपट्टी भरण्यासाठी गेले असता दोन्ही मिळकती त्यांच्या नावावर नसून, त्या दुसऱ्याच्या नावावर झाल्याचे त्यांना समजले. याबाबत त्यांनी माहिती घेतली असता प्रभाकर नाईक आणि अंबावी पटेल यांनी त्यांच्या जागा दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचे त्यांना दिसून आले. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात जून 2025 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी यातील दोन्ही आरोपींना अटक केली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) आनंद कांबळे करत आहेत.







