। तळा । वार्ताहर ।
कृषी विभाग शेतकर्यांना शेती व्यवसायात सक्रिय होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे शेती व्यवसायाला खर्या अर्थाने संजिवनी मिळाली आहे. शेतकरी हा देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. त्याचा लाभ विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी घेत असून शहराकडे धाव न घेता भाजीपाला शेती, शेतीपूरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय करुन आर्थिक स्त्रोत निर्माण झाला आहे. त्यामुळे कृषी विभागाने भाजीपाला उत्पादक शेतकर्यांना बाजारपेठेत माल विक्रीसाठी शासकिय किंवा भाडेतत्वावर कृषी विभाग भाजीपाला उत्पादक विक्री केंद्र स्थापन करावीत, अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.
सध्या शेतकर्यांना बाजारपेठेत विक्रीसाठी जागा नसल्याने घरोघरी किंवा कोणाच्या तरी ओसरीचा पागाणीचा आसरा घ्यावा लागत आहे. उनं, वारा, पाऊस यांचा सामना करावा लागत आहे. विशेषत: महीला वर्गाला मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.कडधान्य, फळं, फुल याला चांगली मागणी असुन शेतकरी शेतात राबवून चांगला नफा मिळू लागला आहे. मागील पाच वर्षांपासून या व्यवसायात शेतकरी उत्तम उत्पादन घेत आहेत. त्यामुळे मा. कृषीमंत्री व जिल्हा कृषी अधिकारी यांनी त्यासंबंधी विषेश लक्ष घालावे. तसेच, तळा तालुका कृषी विभागाने तालुक्यातील शेतकर्यांना उत्पादक विक्री केंद्र स्थापन करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.