। महाड । वार्ताहर ।
इस्तानाबुल तुर्की येथे दिनांक 24 ते 30 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या एशियन पावर लिफ्टिंग स्पर्धेत रायगडची सलोनी पद्माकर मोरे (महाड) हिने 63 किलो वजनी गटात आपल्या भारत देशाला रौप्यपदक मिळून दिले आहे. तिच्या या कामगिरीबद्दल रायगड जिल्हाचे नाव चमकले आहे. कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सलोनी मोरे हिने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हे रौप्य पदक प्राप्त केले आहे. आतापर्यंत तिने राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यामुळे तिला आशियायी स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली होती. पॉवरलिफ्टिंग या खेळाचे मार्गदर्शन तिला प्राध्यापक नवनाथ गायकर यांच्याकडून लाभले आहे. सलोनी मोरे यांच्या यशाबद्दल रायगड जिल्हा पावरलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष गिरीष वेदक, सेक्रेटरी अरुण पाटकर, सहसचिव सचिन भालेराव, मारुती अडकर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त, सदस्य राहुल गजरमल, संदीप कृष्णा पाटकर, यशवंत मोकल यांनी आनंद व्यक्त केला.