। वावोशी । वार्ताहर ।
आद्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि.6) खालापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्यावतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच, ज्येष्ठ पत्रकार हनुमंतराव ओव्हाळ, साहित्यिक बंधू अभंगे यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांचे पत्रकारितेतील योगदान आणि समाज जागृतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण करण्यात आले. या कार्यक्रमाला खालापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र जाधव, सचिव जतिन मोरे, मुख्याध्यापक एस.आर. पाटील, फिरोज पिंजारी, दीपक जगताप, मानसी कांबळे, शंकर पवार, सुरेश दिघे, आशिष लोखंडे, एस.आर. कोकणे, तसेच तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.