| कर्जत । वार्ताहर ।
शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक सावित्रीबाई जोतीराव फुले यांची मंगळवार (दि.3) कर्जत नगरपरिषदेच्यावतीने अभिवादन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांची जयंती, महिला मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी नगरसेविका प्राची डेरवणकर, संचिता पाटील,नगरसेवक राहुल डाळींबकर, सोमनाथ ठोंबरे,नगरपरिषद कर्मचारी सारिका कुंभार,रविंद्र लाड, बापू बेहराम,हृषिता शिंदे, सायली निंबरे, सामिया चौगुले आदी उपस्थित होते.