क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना अभिवादन

पीएनपी महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन

| अलिबाग | प्रतिनिधी |

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभागाकडून (दि. 28) रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

या स्मृतिदिनानिमित्त सर्वप्रथम महाविद्यालयातील इतिहास विभागाकडून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कला शाखेतील इतिहास विभागात शिकत असलेली विद्यार्थिनी गौरी पुरोहित या विद्यार्थिनीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.

महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रा.साईनाथ पाटील यांनी ‌‘महात्मा फुले यांचे सामाजिक आणि शैक्षणिक योगदान‌’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या स्मृतिदिनानिमित्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांना अभिवादन करण्यासाठी इतिहास विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इतिहास विभाग प्रमुख प्रा. मिलिंद घाडगे यांनी केले.

Exit mobile version