शैक्षणिक संकुलात ध्वजास मानवंदना

| चिरनेर | वार्ताहर |

ज्ञान प्रसारण शिक्षण संस्थेच्या रामचंद्र मात्र विद्यालय तसेच जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स आवरे येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सलग तीन दिवस साजरा करण्यात आला. या महोत्सवाची सुरुवात शनिवार, 13 ऑगस्ट रोजी तलाठी नाले यांच्या हस्ते, तर रविवार, दि. 14 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त वनाधिकारी महादेव गावंड यांनी ध्वजारोहण करून मानवंदना दिली.

सोमवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी उरण पंचायत समितीच्या सभापती समिधा म्हात्रे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे आरोहण करण्यात आले या कार्यक्रमात आवरे ग्रामपंचायततिचे सदस्य गुरुनाथ गावंड (गुरुजी), संतोष पाटील अविनाश गावंड, कमल गावंड, सविता गावंड ,तसेच प्रभाकर म्हात्रे, निलेश म्हात्रे, संजय गावंड, संदीप गावंड, एस.के. गावंड, मनोज गावंड, महेश म्हात्रे यांची उपस्थिती होती.

आवरे, पाले, गोवटणे, कोपरवली, वशिनी चिरनेर ,मोठे भोम या गावातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य सुभाष ठाकूर शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांनी मोलाचे योगदान दिले.

Exit mobile version