| चिरनेर । वार्ताहर ।
आवरे येथील प्राथमिक शाळा कडापे या शाळेतील पहिली ते चौथीच्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना कै. श्री. रा. ग. गावंड कला क्रीडा, व सामाजिक संस्था आवरे संस्थेचे अध्यक्ष नितीन गावंड यांच्या मार्फत विद्यार्थ्यास दोन गणवेश व खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक हितेंद्र म्हात्रे, रमेश पाटील, गावंड कुटुंबातील सदस्य श्री नितीन गावंड,श्री डॉक्टर संदेश गावंड , डॉक्टर नंदिनी गावंड श्री सुनील गावंड, श्री.नामदेव गावंड, श्री गणेश गावंड, श्री.अनिल गावंड, श्री.संदीप गावंड, नवनीत गावंड, साईनाथ गावंड, रुपम गावंड, राजेश्वर गावंड, सहाय्यक शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश पाटील यांनी केले व सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.