। पाली/बेणसे । वार्ताहर ।
आ. रोहित पवार यांच्या भारतातील सर्वात उंच भगवा ध्वज या संकल्पनेने साकारलेल्या भारतातील सर्वात मोठ्या भगव्या स्वराज्य ध्वजाचे अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील बल्लाळेश्वर मंदिरा जवळ पूजन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 1674 साली झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची 74 मीटर ठेवण्यात आली आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे या ध्वजाच्या स्तंभाचे वजन 18 टन आहे. स्वराज्य ध्वजाचा आकार 96 बाय 64 फुट वजन 90 किलो आहे. या सर्वसमावेशक ध्वजाचे पूजन सर्वांच्या हस्ते व्हावे अशी लोकभावना असल्यामुळे महाराष्ट्रासह देशातील विविध ठिकाणी या ध्वजाचे पूजन होत आहे. 37 दिवसांच्या प्रवासात स्वराज्य ध्वज सहा राज्यांमधून बारा हजार किलोमीटर प्रवास करेल. या दरम्यान विविध धार्मिक आध्यात्मिक स्थळे व स्मारके अशा ऊर्जा केंद्र असलेल्या 74 ठिकाणी ध्वजाचे प्रातिनिधिक पूजन होईल. देशभरातील सर्व महत्वाच्या ठिकाणी प्रातिनिधिक पूजन झाल्यानंतर दसर्याच्या मुहूर्तावर 15 ऑक्टोंबरला हा स्वराज्य ध्वज उभारला जाईल.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा गीता पालरेचा,रमेश साळुंके,संदेश शेवाळे,अभिजित चांदोरकर,साक्षी दिघे,रुपाली भणगे,सुजाता वडके, अयोध्या शिंदे, सुलतान बेणसेकर, महंमद धनसे, दिनेश बुरुमकर, डॉ. जयवंत जाधव, दीपक पवार,किरण मढवी,अमित वरंडे, सागर मिसाळ, वैत्रावान गुरव, ऋषिकेश पिंपळे,किरण खंडागळे,सुजाता वडके,अंकिता मोरे,संगीता साखरले, शुभांगी कारखानीस,वंदना गायकर,अस्मिता घरत,रेखा साळुंके,सुनंदा देशमुख, सुजाता भोईर, स्नेहल दंत, विद्या सावंत, सविता शिर्के, सुजाता खंडागळे, रुचिता बेलोसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.