शिरवली येथे समरसता यज्ञ

| माणगाव | प्रतिनिधी |

शिरवली येथे विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्रामार्फत सामाजिक समरसता यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने शुक्रवार, रथसप्तमीला श्रद्धा भाटे यांचे विष्णुबुवांचे चरित्र आणि कार्यावर सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिरवली पंचक्रोशीतील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी 9.30 वाजता यज्ञ कार्य सुरू झाले. यज्ञाचे पौरोहित्य विक्रम विनायक वेद पाठशाळा, रेवदंडा यांचे प्रमुख आचार्य अजय शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी शिशिर मुळी, अक्षय लिब्दे आणि सात विद्यार्थ्यांनी केले. यज्ञ कार्याचे यजमान वसंतराव पोळेकर आणि प्रतिभा पोळेकर होते. यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी शिरवली पंचक्रोशीतील सर्व समाजातील बांधवांनी जोडप्याने आणि वैयक्तिकरित्या सहभाग घेतला. कातकरी – आदिवासी समाजातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यज्ञामध्ये आहुती अर्पण केल्या.

Exit mobile version