समर्थ सुकेळी धनगरवाडा क्रिकेट स्पर्धा; काळभैरवी कानसई संघ विजेता

नागोठणे वार्ताहर
नागोठण्याजवळील समर्थ सुकेळी धनगरवाडा यांच्या वतीने नुकत्याच ओव्हरआर्म विभागीय क्रिकेट असोसिएशन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे उद्घाटन ऐनघर ग्रामपंचायतीच्या सरपंच कलावती राजेंद्र कोकळे, पत्रकार शामकांत नेरपगार व पत्रकार अ‍ॅड. महेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत काळभैरवी कानसई संघाने विजय संपादन करून प्रथम क्रमांक मिळविला. आदिमाया हेदवली संघ विजेता, जय वाघोबा खैरवाडी संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.
दरम्यान, शिवसेना जिल्हा सल्लगार राजिप सदस्य किशोर जैन यांच्या हस्ते काळभैरवी कानसई संघास विजेतेपद देऊन गौरविण्यात आले. द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणार्‍या संघांनाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी रोहा पं. स. सदस्य संजय भोसले, ऐनघर ग्रामपंचायत उपसरपंच भाई लाड, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य मनोहर सुटे, किशोर नावले, पत्रकार शामकांत नेरपगार, जगन कोकळे, राजेंद्र कोकळे, जनार्दन कोकळे, सुनील कोकळे आदी मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजेंद्र कोकळे, जगन कोकळे, आवेश कोकळे, गणेश कोकळे, किरण बावदाने, सुभाष कोकळे, धर्मा कोकळे, उत्तम बावदाणे, नितीन कोकळे आदींनी मेहनत घेतली.

Support authors and subscribe to content

This is premium stuff. Subscribe to read the entire article.

Subscribe

Gain access to all our Premium contents.
More than 100+ articles.

Buy Article

Unlock this article and gain permanent access to read it.
Exit mobile version