। गडब । वार्ताहर ।
वडखळ पोलीस ठाणे येथे उपविभागिय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांच्या उपस्थितीत वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शना खाली वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांची दहीहंडी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्थेबाबत सतर्कतेच्या सूचना या अनुषंगाने बैठक घेतली.
दरम्यान, हद्दीतील सर्व पुरुष पोलीस पाटील यांना एकाच प्रकारचा गणवेश सफारी प्रदान करण्यात आला आहे, तसेच महिला पोलीस पाटील यांना एकाच प्रकारची साडी प्रदान करण्यात आली आहे. त्यावर त्याचे नाव, पोलीस पाटील गावचे नाव नमूद असलेले नेम प्लेट आहेत. यामुळे पोलीस पाटलांची स्वतंत्र ओळख निर्माण होईल, बंदोबस्त, नाकाबंदी, रात्र गस्तध्ये त्यांचा उपयोग होईल आणि प्रभावी गुन्हे प्रतिबंध करण्यात यश येईल. या गोष्टीमुळे सर्व पोलीस पाटलांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाला असून, याचा उपयोग प्रभावी गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी करून घेत आहोत, असे वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे म्हणाले. याबद्दल सर्व स्तरातून या कामगिरीचे कौतुक होत आहे.







