नांदगावमध्ये विकासकामांना मंजुरी

। कोर्लई । वार्ताहर ।
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुरुड तालुक्यात विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये नांदगाव वाघोबा मंदिर ट्रस्ट व कोळी समाजासाठी 39 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी नुकतीच नांदगावला भेट देऊन या कामांचे प्रशासकीय मंजुरी पत्र मान्यवरांच्या उपस्थितीत तालुकाध्यक्ष मंगेश दांडेकर यांना प्रदान केले. यावेळी राष्ट्रवादच्या जिल्हा उपाध्यक्षा स्मिता खेडेकर, तालुकाध्यक्ष मंगेश दांडेकर, योगेंद्र गोयजी, लहू रावजी, सदानंद तरे, महेश मापगावकर, योगेश पाटील, सागर देवळेकर, नरसिंह मानाजी,भाऊ घुमकर मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version