। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जतचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांची दहशतवाद विरोधी शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे गुन्हे शाबिती शाखेचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. गरड यांच्या जागी नियंत्रण कक्षातील संदीप भोसले यांची कर्जत पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक देण्यात आली आहे.







