| नेरळ | प्रतिनिधी |
अगदी लहान वयात आई- वडील यांचे छत्र हरवलेला कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायत मधील भूतीवली गावातील संदीप मारुती कोंडे या तरुणाने जिद्दीच्या जोरावर पोलीस सेवेत भरती होण्यात यश मिळविले आहे. त्यांचा नुकताच अलिबाग येथे जिल्हा क्रीडा संचालक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मारुती कोंडे आणि त्यांच्या पत्नी यांचे संदीप लहान असताना निधन झाले. त्यानंतर अगदी गरीब परिस्थितीत हलाखीचे जीवन जगत आणि प्रतिकृत परिस्थीवर मात करीत संदीप याने प्रसंगी चालत जात शाळा गाठणे आणि शिक्षण घेण्याचे काम केले .डोंगर कपारीमध्ये दररोज ये जा असलेल्या संदीप कोंडे याने आपल्या मोठ्या भावाच्या पाठिंब्याने पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांनतर एका अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेऊन पोलीस भरतीचा अडथळा यशस्वीपणे पार केला. त्याचवेळी संदीप स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी देखील आघाडीवर असून अनेक तरुणांना प्रशिक्षण देत आहे.
संदीप कोंडेची पोलीस सेवेत भरती
