संदीप पाटील मुरुड मर्चंटचे अध्यक्ष

। आगरदांडा । वार्ताहर ।
मुरूड तालुका मर्चंट को.ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि.निवडणुक अध्यासी अधिकारी पी.एम.वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या निवडणुकीत चेअरपदी संदीप गजानन पाटील तर व्हाइस चेअरमनपदी ललित रतनचंद जैन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक पदी नितिन आबुर्ले,अशोक धुमाळ,विपृल मेहता,अल्ताफ खतीब, राजकुमार कल्याणी, नौशाद दळवी,विजय गिदी, महेंद्र पारेख,वासंती उमरोटकर,नगमाना खानजादे यांची संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

Exit mobile version