| पेण | प्रतिनिधी |
पेण पक्ष कार्यालयात काल झालेल्या बैठकीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य संदेश ठाकुर यांची शेकाप कार्यालयीन चिटणीस म्हणून नेमणुक करण्यात आली. यावेळी आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा चिटणीस अॅड. अस्वाद पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा अर्थ व बांधकाम सभापती अॅड. निलीमा पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे (हरी ओम) अदींसह मोठया संख्येने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते हजर होते. संदेश ठाकुर हे या आगोदर वाशी विभागाचे चिटणीस म्हणून काम पाहत होते. परंतु, त्यांच्या कामाची तळमळ पाहता पेण तालुका कार्यालयीन चिटणीसची जागा रिक्त असल्याने त्या जागी त्यांची नेमणुक करण्यात आली आहे. तरी त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्थरातुन अभिनंदन केले जात आहे.