| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय सराफा बाजारात सोमवारी (दि.12) सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. यावेळी सोन्याचे एका तोळ्याचे दर 2,883 रुपयांनी महागले आहेत. तर, चांदीच्या दरात एका दिवसात 14,475 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा जीएसटीशिवायचा दर 2 लाख 57 हजार 283 रुपये किलो इतका आहे. जीएसटीसह एक किलो चांदीचा दर 2 लाख 65 हजार 1 रुपये किलो आहे. तर, सोन्याचा जीएसटीशिवायचा एका तोळ्याचा दर 1 लाख 40 हजार 5 रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह एक तोळे सोन्याचा दर 1 लाख 44 हजार 205 रुपयांवर पोहोचला आहे. शुक्रवारी (दि.9) चांदीचे दर 2 लाख 42 हजार 808 रुपये किलोवर होते. तर, सोन्याचा दर 1 लाख 37 हजार 122 रुपये एक तोळा होता. जीएसटीशिवायचा सोन्याच्या दराचा उच्चांक मोडला गेला आहे. जीएसटीशिवाय एक तोळे सोन्याचा यापूर्वीचा उच्चांक 1 लाख 38 हजार 181 रुपये होता. चांदीच्या दराने देखील 7 जानेवारीचा 2 लाख 48 हजारचा उच्चांक मोडला आहे.
साने, चांदीने गाठला उच्चांक
