श्री ब्रह्मचैतन्यतर्फे संगीत सभा

| पनवेल | वार्ताहर |

श्री. ब्रह्मचैतन्य मासिक संगीत सभेचे 28 वे पुष्प संपन्न झाले. पनवेल येथील गोंदवलेकर महाराज नामस्मरण केंद्रामधे सादर झालेल्या या कार्यक्रमात हावडा (कलकत्ता) येथील शास्त्रीय गायिका बसू श्री मुखर्जी यांनी गायन सेवा केली. संगीत सभेची सुरुवात त्यांनी राग मुलतानी या रागातील एक बंदिश गाऊन केली. त्यानंतर त्यांनी कलावती रागातील तन मन धन टोपे वारु ही बंदिश सादर केली.


यानंतर दर्शन दे रे शंकरा ही बंदिश त्यानी सादर केली. बसुश्री याना सिद्धार्थ कर्वे यांनी संवादिनी तर बनारस येथील गौरव बॅनर्जी यांनी तबला साथ केली. चैतन्य कोशे यांनी ताल वाद्याची साथ केली. सुखदा मुळ्ये घाणेकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. सभा यशस्वी करण्यासाठी आयोजन समिती सदस्य आणि मठातील सर्व कार्यकर्त्यानी मोलाचे योगदान दिले.

Exit mobile version