सांगोला तालुक्यात शेकापचाच बोलबाला

| कोळा | वार्ताहर |
ज्येष्ठ नेते स्व. गणपतराव देशमुख यांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच सांगोले तालुक्यातील 7 जागेच्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत शेकापने घवघवीत यश संपादित केले. खवासपुर ,मेडशिंगी,सोनंद या तीन जागेचे मतदान मंगळवारी पार पडले व त्या तिन्ही जागेचे निकाल बुधवार दि 22 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले त्यामध्ये खवासपुरच्या सौ सविता संभाजी भोसले ,सोनंद रंजना केशव बाबर,मेडशिंगी सुशिला मनोहर सोनलकर हे शेतकरी कामगार पक्षाचे ऊमेदवार प्रचंड मताने विजयी झाले. त्याचप्रमाणे लक्ष्मीनगरचे लक्ष्मण नरळे ,कटफळच्या अश्‍विनी प्रशांत कारंडे हे शेकापक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडुन आलेले आहेत चिकमहुद व धायटी या ठिकाणी शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या आघाडीला दोनच जागी यश संपादन झाले आहे. विजयी उमेदवारांचे अभिनंदन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ जयंत पाटील महाराष्ट्राचे शेकाप पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.


पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डाँ भाई बाबासाहेब देशमुख व युवा नेते डाँ भाई अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेषता तरुणांनी ह्या निवडणुका ताब्यात घेतल्या होत्या. चंद्रकांत देशमुख ,चिटणीस दादाशेठ बाबर, बाबासो,करांडे सभापती,उपसभापती जिल्हापरीषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी केलेली कामे यांच्या जोरावरती व गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर हा विजय संपादन करण्यात आला आहे. विशेषता खवासपुर येथील निवडणुकीमध्ये विद्ययमाना आमदार,विद्यमान जिल्हापरिषद सदस्य ,विद्यमान पंचायत समिती सदस्य यांनी आपली प्रतीष्ठा पणालालावलेली होती तरीही सुज्ञ मतदारांनी शेतकरी कामगार पक्षाच्या बाजुने मतदान करुन एक इतिहास निर्माण केला.येणार्‍या जिल्हापरिषद पंचायत समितीच्या निवडणुकमध्ये ह्या निकालाचा निश्‍चीत परीणाम होईल ह्या निकालामुळे शेकापक्षामध्ये अक्षरशा नवचैतन्य निर्माण झाले आहे व सांगोले तालुक्यात स्व आबासाहेबांच्या विचारांचा पुंन्हा एकदा बोलबाला असल्याचे प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगितले.

स्वर्गीय आबासाहेब यांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच निवडणुका झाल्या शेकाप पक्षाच्या गावोगावच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जोमाने काम करून मोठा विजय संपादन केला आहे सर्व कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो नूतन सदस्यांना भावी कार्यास शुभेच्छा. – डॉ.बाबासाहेब देशमुख प्रदेशाध्यक्ष, पुरोगामी युवक संघटना महाराष्ट्र राज्य.

Exit mobile version