मुथुट फिनकॉर्पकडून स्वच्छतादुतांचा सत्कार

। रसायनी । वार्ताहर ।
मुथुट फिनकॉर्पंतर्फे खोपोली नगरपरिषदमधील स्वच्छतादूतांचा तसेच कोरोना योद्धांचा सत्कार सोहळा 5 ऑक्टोबर रोजी मुथूट फिनकॉर्प खोपोली शाखेमध्ये संपन्न झाला. कोरोनाच्या महामारीमुळे आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कुटुंबाचा विचार न करता खोपोली नगरपरिषदेचे स्वच्छतादूत म्हणून काम करीत होते. त्यांच्या या कामाची पोच पावती म्हणून मुथुट फिन्कॉर्पचे पदाधिकारी चैत्रराज नायर, प्रियांका वाणी, गणेश तोरणे, आकांक्षा देवकर, सीमा चव्हाण, नम्रता विचारे यांच्याहस्ते कोरोनायोध्दे दिलीप मोरे, मंगेश गायकवाड, सीताराम पवार, योगेश यादव, अविनाश ठाकरे, संतोष यादव, बाबू मोरे, विलास गायकवाड, संदीप फाळे, विठोबा म्हात्रे, विजय वाघमारे, नितीन ढोले, निलेश गायकवाड, आनंद शिंदे, मयूर साळुंके यांचा सत्कार करण्यात आला.

Exit mobile version