अलिबाग नगरपरिषदेतर्फे स्वच्छता क्वीन कार्यक्रम

। अलिबाग । वार्ताहर ।
स्वच्छ अलिबाग सुंदर अलिबाग या अभियान अंतर्गत अलिबाग नगरपरिषद व इकोसत्व इन्व्हायरमेन्टल सोल्युशन प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने व द.इंक्युबेशन नेटवर्क आणि सेकंड म्युस यांच्या सहकार्याने अलिबाग शहरामध्ये सुरू असलेल्या घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत नागरिकांमध्ये कचरा वर्गीकरण जनजागृतीसाठी स्वच्छता क्वीन कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. हा कार्यक्रम श्रीबाग 2 येथील गणपती मंदिर येथे संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना इकोसत्व कंपनीतर्फे शहरात सुरु असलेल्या आदर्श घनकचरा व्यवस्थापनाबाबत कामाची माहिती देउन कचरा वर्गीकरण तसेच कचरा वर्गीकरणाचे चार प्रकार व त्यामध्ये येणारे घटक याची सविस्तर माहिती दिली. यावेळी गटनेते व नगरसेवक प्रदीप नाईक, नगरसेवक महेश शिंदे, नगरसेविका प्रिया वेलणेकर तसेच इकोसत्व समन्वयक सुरेश घोरपडे, प्रकल्प प्रमुख संतोष राखेमल्लू, नदीम खान, प्रतिनिधी रेश्मा ढावरे, पुजा पिंगळे, नयना ढोरे उपस्थित होते.


याप्रसंगी कंपनीच्या प्रतिनिधी रेश्मा ढावरे यांनी महिलांना घरातुन निघणार्‍या ओल्या कचर्‍यापासून कंपोस्टिंग खत कसे करावे व वेगवेगळ्या प्रकारच्या होम कंपोस्टिंगबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी महिलांना कंपोस्टिंग खताची माहिती आवडली व सर्व उपस्थित नागरिकांनी कंपोस्टिंग करण्याचा निश्‍चय केला. त्यानंतर महिलांचे वेगवेगळे खेळ घेण्यात आले. त्याद्वारे कचरा वर्गीकरण व घरगुती खत तयार करण्याबाबत सांगण्यात आले. प्रश्‍नोत्तरे, रंगीत मणी निवडणे, तांदळातुन बटण निवडण्याच्या खेळात महिलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. या स्पर्धेत भाग्यश्री महाजन यांनी प्रथम क्रमांक क्रमांक मिळविल्यामुळे त्यांची स्वच्छता क्वीनचा किताब देण्यात आला. तसेच राधिका गुप्ता यांनी द्वितीय क्रमांक तर सुशिला गायकवाड यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. यावेळी गटनेते प्रदीप नाईक, नगरसेवक महेश शिंदे, नगरसेविका प्रिया वेळणेकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण केले.

Exit mobile version