| कोर्लई | प्रतिनिधी |
कोकण मराठी साहित्य परिषदेचे रायगड जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ यांना महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाचा सन 2025 चा कोकण रत्न पुरस्कार प्राप्त झाला. याबद्दल अलिबाग येथील क्षात्रैक्य समाजाचे अध्यक्ष द्वारकानाथ उर्फ कबन नाईक यांनी मुरुडमधील महात्मा फुले पतसंस्थेच्या सभागृहात संजय गुंजाळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. महात्मा फुले पतसंस्थेचे चेअरमन अजित गुरव व संचालक मनोहर गुरव, नवनिर्वाचित नगरसेवक आदेश दांडेकर, अनघा चौलकर, उदय दांडेकर, प्रवीण भायदे, चेअरमन अजित गुरव, मॅनेजर राकेश मसाल यावेळी उपस्थित होते. क्षात्रैक्य समाजाच्या अलिबाग कुरुळ येथील कै.नंदकुमार नाईक सभागृहात संस्थेचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन व वधु-वर परिचय मेळावा रविवार दि. 11 जानेवारी रोजी होणार आहे. समाजातील गुणवंतांचा गौरव करणे आणि त्याच्या उल्लेखनिय कामाची समाजाला ओळख करुन देणे हे संस्थेचे प्रमुख उद्दीष्ट आहे, या भूमिकेतून संस्थेने वर्धापन दिनी कोकण रत्न पुरस्कार प्राप्त संजय गुंजाळ यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे निमंत्रण यावेळी कबन नाईक यांनी गुंजाळ यांना दिले.







