संजय राऊतांचा मोदींवर घणाघात

। नाशिक । प्रतिनिधी ।

गेल्या एक महिन्यात मोदींनी महाराष्ट्रात 28 सभा घेतल्या. शिवसेनेमुळे नरेंद्र मोदींना रस्त्यावर यावे लागले. कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, हा महाराष्ट्र तुमच्या मागे उभा राहणार नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, मिस्टर फेकूसुद्धा नाशकात होते. भाड्याची माणसे तिथे आली. मोदी भाषण करताना एका तरुणाने प्रश्‍न विचारला तर पंतप्रधान त्याच्याकडे रागाने पाहत भारत माता की जय म्हणत निघून गेले. मात्र, तो शेतकरी रामाचा सुधा आहे आणि भारत मातेचे सुपुत्र आहे. जर तुम्ही काही न बोलता जात असाल तर या थापाड्याची देशाला गरज नाही. माझ्याशिवाय देशाला पर्याय नाही ही मोदींची घमेंड आहे. ती उतरविण्याची वेळ आता आलीय.

Exit mobile version