संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट

सिल्व्हर ओकवर राजकीय चर्चांना उधाण

। मुंबई । वृत्तसंस्था ।
शिवसेनेचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. सकाळी 9 च्या दरम्यान संजय राऊत पवारांच्या राहत्या घरी म्हणजेच सिल्वर ओकवर दाखल झाले. या भेटीचे नेमके कारण काय? यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे.
दिवाळीच्या काळात शरद पवार आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय बारामतीला होते. त्यामुळे या काळात राऊतांना प्रत्यक्ष भेटता आले नाही. पवार आता मुंबईत आलेले आहेत. आज अगदी सकाळी 9 च्या आसपास संजय राऊत सिल्वर ओकवर दाखल झाले. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेआधी संजय राऊत व शरद पवार यांच्यामध्ये बैठक एक चर्चेचा विषय समजला जात आहे. या भेटीचे कारण शरद पवार आणि कुटुंबांना प्रत्यक्ष भेटून राऊत दीपावलीच्या शुभेच्छा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Exit mobile version