| मुंबई | प्रतिनिधी |
नरेंद्र मोदी हा एक लटकता आत्मा आहे. तो इकडे तिकडे लटकत फिरत आहे. त्या लटकत्या आत्म्यासोबत महाराष्ट्रातील आमचे पवित्र आत्मे कधीच जाणार नाहीत, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी फटकारले.
मोदींनी दिलेल्या ऑफरसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, मोदींची ऑफर हा बालिशपणा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे आपला स्वाभिमान सोडून आणि राष्ट्रहिताचा बळी देऊन कधीच नरेंद्र मोदींसोबत जाणार नाहीत. मोदींना आता पराभव दिसू लागला आहे. उद्धव ठाकरे व शरद पवार हे मोदींना कधीच घाबरणार नाहीत. जे घाबरणारे होते, ते मोदींसोबत गेले आहेत.
आपण कुठे लटकत आहोत हे मोदींना समजत नाही. मोदींची वक्तव्ये बघा, ते आज एक बोलतात, उद्या एक बोलतात. मला तर वाटतेय नरेंद्र मोदींची प्रकृती बरी नाही. भाजपमधील सहकाऱ्यांनी त्यांची प्रकृती नीट तपासून घ्यावी. मोदींना उपचार आणि विश्रांतीची गरज आहे, असे संजय राऊत यांनी फटकारले.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसारखे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे कुठेही म्हटलेले नाही. काँग्रेस भविष्यात मजबूत पक्ष होईल आणि देशाचे नेतृत्व करेल त्यासंदर्भात शरद पवार बोलले. मोदी हे पराभूत मनोवृत्तीतून बोलताहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.
मोदीच एक लटकता आत्मा: संजय राऊत
