। मुंबई । वृत्तसंस्था ।
पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांना दसराही तुरुंगातच घालवावा लागणार आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आज त्यांच्या प्रकरणावर कोर्टात सुनावणी झाली, त्यामध्ये पुढील सुनावणी आता १० ऑक्टोबरला होणार असून त्यांचा दसरा मेळावा तुरूंगातच होणार आहे.
गटप्रमुखांच्या मेळाव्यात संजय राऊत अनुपस्थित असल्याने त्यांचं नाव असलेली खुर्ची रिकामी ठेवली होती. दसरा मेळाव्याच्या आधी संजय राऊत बाहेर येतील आणि तोफ धडाडेल अशी शिवसैनिकांनी अपेक्षा होती. पण कोठडीत वाढ झाली असल्याने शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात संजय राऊत हजर राहू शकणार नाहीत.