संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ

। मुंबई । वृत्तसंस्था ।

शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीच्या विशेष न्यायालयाने 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानुसार आज संजय राऊत यांची कोठडी संपली. त्यामुळे त्यांना आज कोर्टात हजर करण्यापूर्वी जेजे रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना ईडीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं.

संजय राऊत यांच्या अटकेनंतरही ईडीने मुंबईतील अनेक ठिकाणी धाडसत्र केलं. गोरेगाव येथेही राऊत यांच्या संबंधितांवर ईडीने धाड मारली होती. त्यात ईडीला काही महत्त्वाचे पुरावे सापडल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच संजय राऊत यांच्याविरोधात भक्कम पुरावे तयार झाल्याने राऊत यांना आजही कोर्टाकडून दिलासा मिळू शकला नाही.

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना आता आर्थर रोड तुरुंगात 5 सप्टेंबरपर्यंत राहावं लागणार आहे. आता 5 सप्टेंबर रोजीच त्यांच्या पुढील सुनावणीवर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version