। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसेना खासदार संजय राऊतांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना पत्र पाठवून भाजप आणि ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. या पत्रावरुन माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी आजचं पत्र हे केवळ माहिती साठी होते, अजून ट्रेलर देखील बाकी आहे, लवकरच सर्वांना बेनकाब करणार असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.
संजय राऊत या पत्राविषयी बोलताना म्हणाले की, मसध्या ईडी आणि इतर यंत्रणा या भाजपच्या किंवा त्यांच्या मालकांच्या क्रिमिनल सिंडिकेटच्या एक भाग बनलेल्या आहेत. आजचे हे पत्र आहे ना तो ट्रेलर सुद्धा नाही.. आजचे लेटर हे मी केवळ माहितीसाठी दिले होते. ट्रेलर यायचा आहे. ईडीच्या लोकांचे काम कशाप्रकारे सुरु आहे, यांचेच कशाप्रकारे आर्थिक घोटाळे आहेत, यांच्याकडून मनी लॉन्ड्रिंग सुरू आहे, हे ब्लॅकमेलिंग करतात, पैसे गोळा करतात, यांचे वसूली एजंट देखील आहेत. मी लवकरच ईडीला बेनकाब करेल. हे ठाकरे सरकारला, शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना बदनाम करत असल्याचा आरोप देखील राऊतांनी केली आहे. संजय राऊत बोलताना म्हणाले की, ममाझ्या मुलीच्या लग्नातील फुलवाला, डेकोरेशनला ईडीने उचलले आहे. हे त्यांचं काम आहे का? या लोकांना राऊतांकडून किती पैसे मिळाले असे विचारण्यात आले. तर तुम्हाला नागपुरातही जाता येणार नाही
हे सरकार पडणार नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री राहणार आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही प्रचंड त्रास दिला जातोय. रोज सकाळी एखादा माणूस उठतो आणि त्याच्यावर ईडी कारवाई केली जाते. मी मागे देखील बोललो की, आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपुरलाही जाता येणार नाही. – संजय राऊत, खासदार
सिंह कधी गिधाडांना घाबरत नाही, संजय राऊत जे प्रयत्न करत आहेत, ते त्यांचे सगळे प्रयत्न व्हिक्टिम कार्ड खेळणे एवढेच आहे. राऊतांचे जे म्हणणे आहे ते त्यांनी न्यायालयात मांडावे, त्यांच्या अशा वक्तव्यांना महत्व देण्याची गरज नाही.मोदींच्या सरकारमध्ये कोणालाही व्हिक्टिम केलं जात नाही. – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते