| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी सोमवारी (दि. 11) देशाचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्या. खन्ना यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या या शपथविधी समारंभावेळी देशाचे मावळते सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड उपस्थित आहेत. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना वकिलीचा वारसा त्यांचे वडील देवराज खन्ना यांच्याकडून मिळाला. देवराज खन्ना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिले आहेत. तर संजीव खन्ना यांचे काका हंसराज खन्ना हे सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. निवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा कार्यकाळ 2 वर्षांचा होता. नवे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ केवळ 6 महिने असेल. 13 मे 2025 रोजी ते सरन्यायाधीश पदावरुन निवृत्त होतील.