खालापुरात संजोग वाघेरे पाटलांचा बोलबाला

गावभेटी दौर्‍यात मोठा प्रतिसाद, प्रचारात तरुणाई एकवटली

| खोपोली | प्रतिनिधी |

मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी शनिवारी सकाळपासून साजगाव जि.प. वॉर्डातून गावभेटी दौर्‍याल सुरूवात केली. यावेळी चौकाचौकात महिलांनी औक्षण करीत वाघेरेंना पाठिंबा असल्याचे सांगितले. प्रचारात तरुणाई गावागावात एकवटत आहे. खोपोली परिसरात प्रचार दौर्‍यात ‘संजोग वाघेरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. गावगावात फटाके फोडून त्यांचे स्वागत विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. वाघेरे यांनी गावा-गावांमध्ये ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ज्येष्ठ नागरिक यांच्या भेटी घेत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला साथ देण्यासाठी मशाल चिन्ह निवडा, असे आवाहन उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी यावेळी केले.

संजोग वाघेरे यांनी सारसन फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गावभेठी दौर्‍याला प्रारंभ केला. त्यानंतर साजगाव येथे शेकापचे नेते रामभाई तावडे, माजी उपसरपंच नितीन देशमुख यांनी जंगी स्वागत केले. त्यानंतर ढेकू, होनाड, आत्करगाव येथे शेकापक्षाचे संतोष पाटील यांच्यासह महिलांनी स्वागत केले. ठाणेन्हावे, उंबरे, चावणी, शेमडी, दूरशेत, खानाव, चिलठण, देवन्हावे येथे उपसरपंच मनोज पाटील, बंटी नलावडे, भूषण कडव, प्रसाद तावडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. खरीवली, नारंगी, आपटी, नंदनपाडा, होराळे जांभिवली, गोरठण, वावोशी, शिरवली येथे सरपंच महेश पाटील यांच्या ग्रामस्थांनी जोरदार स्वागत करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

गावभेटी दौर्‍यात सेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील, सेनेचे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, शेकापक्षाचे संतोष जंगम, शहर चिटणीस अविनाश तावडे, रवींद्र रोकडे, कैलास गायकवाड, संतोष पाटील, शांताराम पाटील, सेनेचे युवा सेनेचे महेश पाटील, अनिता पाटील, सुविधा विचारे यांच्यासह महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खालापुरात संजोग वाघेरे पाटील यांना प्रचार दौर्‍यातही प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा भरभरून पाठिंबा मिळाला. संजोग वाघेरे यांनीच मावळ मतदारसंघामध्ये प्रचारात आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळेच विजयाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार, हे निश्‍चित झाले असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version