| रसायनी | वार्ताहर |
मावळ लोकसभा इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा वासांबे जिल्हा परिषद विभागातील प्रचाराचा नारळ दांडफाटा येथील नवसाला पावणाऱ्या आई टाकेदेवीला फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत मशाल चिन्हाला निवडून आणण्याचा चंग बांधला. त्यानंतर वासांबे मोहोपाडा विभागातील कार्यकर्त्यांनी तळेगाववाडी, कातकरीवाडी, तळेगाव, पानशिळ, खोंडा, मोहोपाडा कातकरीवाडी येथे प्रचार घराघरात मशाल चिन्हाचा प्रचार केला.
यावेळी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांचा प्रचारातील उत्साह पाहून संजोग वाघेरे पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे मतदार राजाकडून बोलताना दिसून आले. प्रचारप्रसंगी कार्यकर्त्यात मोठा उत्साह दिसून आला. यावेळी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून उमेदवार व मशाल निशाणी व्यवस्थित समजावून सांगण्यात आली.
दरम्यान, वासांबे जिल्हा परिषद विभागातील इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी सज्ज झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.