पेठेचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सुत्य उपक्रम
| महाड | प्रतिनिधी |
महाड शहरातील सामाजिक सांस्कृतिक धार्मिक, मदत कार्यात अग्रेसर असणाऱ्या बालमित्रमंडळ पेठेचा राजा तर्फे यावर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन करत रक्तदानचा संकल्प कार्यसिद्धीस नेण्यात आला. रविवारी सकाळी 11 ते 2 या कालावधीत मंडळाच्या गणपती मंडपात पे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. जवळपास 23 रक्तदात्यांनी रक्तदान करत एकच दान रक्तदानला अनुसरून रक्तदान केले. या रक्तदान साठी कै. काकासाहेब चितळे संचलित जनकल्याण रक्तकेंद्र महाड चे सहकार्य लाभले या वेळी जनकल्याणचे रविकांत शिंदे ,डॉ. माधव कोळपे, सरस्वती पाटोळे, रोशनी जाधव, नामिरा चरफरे, समीक्षा शिर्के याच्या टीमने रक्तदानची प्रकिया पार पाडली
यावर्षी मंडळाने किल्ले संवर्धन हा देखावा सह कागदाच्या लगद्यापासून घडविण्यात आलेली 5 फुटी मंगलमूर्तीची स्थापना केली आहे. गेली 55 वर्षात मंडळाने ताजमहाल, शनिवार वाडा, या सहा पौराणिक कथा देखाव्या मध्ये राक्षसाची गुहा, अलिबाबा चाळीस चोर ,द्रौपदी वस्त्रहरण ,जटायू युद्ध,आदी सह ज्वलंत प्रश्नावर आधारित झाडे लावा झाडे जगवा ,स्त्री भुणहत्यासह वृद्धाश्रम वर देखावा सादर केला आहे. मंडळातील अनेक तरुण मंडळी यांनी रक्तदान केले तर काही तरुण मंडळींनी प्रथम रक्तदान केले. या वेळी 23 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. जनकल्याण त़र्फे रक्तदात्याना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले.