राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत संकेत म्हात्रेला 5 सुवर्ण

। पेण । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील पाटणेश्‍वर गावाचा रहिवासी तथा नवी मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारा रायगड भूषण संकेत केशव म्हात्रे याने धुळे येथे झालेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत 50 मीटर फ्रीस्टाइल, 100 मीटर फ्रीस्टाइल, 200 मीटर फ्रीस्टाइल, 4 बाय 100 मीटर मिडले रिले व 4 बाय 100 मीटर फ्रीस्टाइल रिले यात 5 सुवर्णपदके जिंकली.
या कामगीरीची दख्खल घेउन राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा 18 मे ते 22 मे या काळावधीत केरळ येथे होणार आहे. प्रशिक्षक मदन धर्मा कडेकर आणि समर्थ राजाराम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचा सराव कर्नाळा स्पोर्ट अ‍ॅकॅडमी मध्ये सुरू आहे. त्याच्या या कामगिरी बाबत व पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती अ‍ॅड. निलीमा पाटील, सभापती मनिषा भोईर, पाटणेश्‍वर सरपंच मानसी नरेंद्र पाटील, नगरसेवक संतोष पाटील, समिर म्हात्रे, यांनी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version