राष्ट्रकुल स्पर्धेत मराठीचा डंका; सांगलीच्या संकेतला सिल्व्हर मेडल

। बर्मिंगहम । वृत्तसंस्था ।
इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये खेळल्या जाणार्‍या कॉमनवेल्थ गेम्स 2022 स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे सांगलीच्या संकेत महादेव सरगरने भारताला पहिलं पदक जिंकून दिलं आहे. 55 किलो वजनी गटात संकेतने रौप्य पदक जिंकले. संकेत सरगरने दोन फेर्‍यांमध्ये 6 प्रयत्नांत पूर्ण ताकद पणाला लावली आणि एकूण 228 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. त्याला सुवर्णपदकाने अगदी थोडक्यात हुलकावणी दिली. त्याच्या चेहर्‍यावर सुवर्णपदक हुकल्याचं दु:ख दिसत होतं, पण त्याचवेळी रौप्यपदक जिंकल्याचा अभिमानही दिसत होता.

संकेतने पहिल्या फेरीत म्हणजे स्नॅचमध्ये सर्वोत्तम 113 वजन उचलले. यानंतर त्याने दुसर्‍या फेरीत म्हणजेच क्लीन अँड जर्कमध्ये 135 वजन उचलून पदक जिंकले. गेल्या वर्षी चॅम्पियनशिपमध्ये देखील त्याने सुवर्णपदक जिंकले होते. संकेतचं मूळ गाव सांगली आहे.

राष्ट्रीय स्तरावर अनेक सन्मान पटकावलेला संकेत महादेव सरगर हा भारताचा स्टार वेटलिफ्टर आहे. तो 55 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करतो. गेल्या वर्षी ताश्कंद येथे झालेल्या चॅम्पियनशिप 55 किलो स्नॅच स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले होते.

Exit mobile version