आझाद मैदानात रंगले भंडारी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे सामने
। अलिबाग । प्रतिनिधी ।
हिंदू भंडारी सेवाभावी संस्था पुरस्कृत भंडारी समजाच्या सहकार्याने अलिबाग तालुका स्तरीय भंडारी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. दोन दिवसीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर वाडगांव येथील संस्कृत इलेव्हन संघ विजेता ठरला. या संघाला मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. शनिवार व रविवारी झालेल्या या स्पर्धेत आठ संघाने सहभाग घेतला होता. यावेळी अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका संजना किर, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर यांच्यासह शिवप्रसाद तोडणकर, अविनाश आचरेकर, डॉ. प्रणाली पाटील, कांचन नार्वेकर, कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळ दादर मुबंई कमिटीचे डॉ. दीपक खोत, सुरेश खोत, संदीप खोत, प्रशांत जाधव, भूषण बिर्जे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
रविवारी झालेल्या अंतिम सामन्यानंतर संस्कृत इलेव्हन वाडगाव संघाने प्रथम क्रमांक मिळविला. स्व. बाबू शिलदणकर इलेवन सासवणे संघाने द्वितीय तर जय हनुमान कातळपाडा संघाने तृतीय क्रमांक मिळवला. या विजेत्या संघाला चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आकाश तवसाळकर यांना स्पर्धेचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष तुकाराम तोडणकर, उपाध्यक्ष सचिन खोत, सचिव रोहन खोत. खजिनदार विनोद टेम्बुळकर, सल्लागार राजेश शिंदे, सदस्य सुजित शिळदणकर, स्वेतेश तोडणकर, यतीन राऊत, अमोल मोरे, कामेश पवार, राकेश शिंदे, रवी जाधव, प्रसाद नागवेकर, प्रशांत चिंबूलकर, साईल पाटील, संतोष कनगुटकर, भूषण बिर्जे, संदेश खोत, प्रणाली पाटील महिला सदस्य, कांचन नार्वेकर आदींनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
