। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्हा पावरलिफ्टिंग माजी राज्यस्तरीय सीनिअर खेळाडू संतोष तामसे यांचे दिनांक 12 जानेवारी रोजी वाराणसी येथे निधन झाले. महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या पनवेल आगारात ते कार्यरत होते. नाट्य, कला आणि क्रीडा क्षेत्राशी ते संबंधित होते. हसतमुख व मनमिळावू स्वभावामुळे ते लोकप्रिय होते. कर्नाळा महोत्सव, पनवेलच्या कला-क्रीडात ते सहभागी असायचे. त्यांचे कार्यविधी 21 जानेवारी रोजी नाशिक येथे होणार आहेत. त्यांच्या निधनामुळे लढवय्या खेळाडू, गमावला आहे.
संतोष तामसे काळाच्या पडद्याआड
