‌‘रोटर’च्या अध्यक्षपदी संयोगिता टेमघरे

| पेण | प्रतिनिधी |

रोटरी क्बल ऑफ पेणचा पदग्रहण सोहळा पेण एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात पार पडला. या पदग्रहण समारंभाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे जिल्हा प्रांतपाल रोटेरिशन शीतल शहा, असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन नितीन कल्यान, रोटेरियन विक्रम जैन हे उपस्थित होते. यावेळी अध्यक्षपदी रोटेरियन संयोगिता टेमघरे, सचिवपदी मधुबाला निकम, खजिनदारपदी जयेश शहा यांची सन 2024 साठी निवड झाली.

रोटरी क्बल ऑफ पेणची स्थापना 10 जून 1994 साली झाली होती. आपल्या तीस वर्षांतील सेवेच्या कारकीर्दीत रोटरी क्लब ऑफ पेणने समाजाकरिता विविध स्तुत्य उपक्रम राबविले आहे व समाजकल्याणसाठी हातभार लावला आहे. रोटरीच्या सामाजिक कार्यासाठी सहकार्य करणारे राजू पीचीका, ॲड. मंगेश नेने, डॉ. सोनाली वनगे, डॉ.किशोर देशमुख, विनोद शहा, योगेश जैन यांचा सत्कार करण्यात आला.

नवनिर्वाचित अध्यक्ष रोटेरियन संयोगिता टेमघरे यांनी नवीन वर्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर आगामी वर्षात आपण सामाजिक कार्यासाठी काय काय करणार आहोत याचा थोडक्यात अहवाल सादर केला. यात दिव्यांग मुलांच्या समस्या व निराधार, वृद्धांसाठी विविध उपक्रम, पर्यावरण जनजागृती व संरक्षण, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील विविध उपक्रम, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेसाठी आणि व्यसनमुक्ती करिता विविध प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याचा विचार दर्शविला. या पदग्रहण कार्यक्रमातच दोन नवीन रोटरी कम्युनिटी कॉरप्स स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच एका गरजू विद्यार्थ्याला शालेय साहित्याचे वाटप याप्रसंगी करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी रोटरी क्बल ऑफ पनवेल, रोहा, कळंबोली, लोणावळा इत्यादी ठिकाणावरून रोटरीचे सभासद उपस्थित होते. तसेच पेणमधील ॲड. मंगेश नेने, डॉ. मनीष वनगे, डॉ. सोनाली वनगे, डॉ. नीता कदम, लिटिल एंजल स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रिता कारखानीस आदी मान्यवर तसेच रोटरी क्बल ऑफ पेणचे सर्व रोटरियन कुटुंबासहित उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वराश्या टेमघरे हिने केले.

Exit mobile version